२६ जानेवारीच्या दिल्ली घटनेवर प्रथमच मोदींचे भाष्य

0

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाला शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर आंदोलन केले. या घटनेनंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त होते. सत्ताधारी पक्षातील नेते यासाठी विरोधकांना जबाबदार धरत आहेत तर विरोधक यासाठी केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर भाष्य केले नव्हते. मात्र आज त्यांनी प्रथमच या घटनेवर भाष्य केले आहे. आज ‘मन की बात’द्वारे देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी 26 जानेवारीला लाल किल्ल्यावर झालेल्या तिरंग्याच्या अपमानावरही भाष्य केले. ”दिल्लीत प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला असे मोदींनी सांगितले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन, कोरोना लसवर ते बोलले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यामध्ये आणखी एक कार्य संपन्न झाले. ते म्हणजे पद्म पुरस्कारांचे वितरण. यामध्ये ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगले काम केले त्यांचा समावेश आहे. क्रिकेटच्या मैदानातूनही या महिन्यात खूप चांगली बातमी मिळाली. आपल्या टीमने सुरुवातीला अनेक अडचणी झेलल्या त्यातून सावरले. मात्र, ऑस्ट्रेलियाला नमवून आले. आपल्य़ा खेळाडूंचे hard work आणि teamwork प्रेरित करणारे आहे, असे मोदी म्हणाले.

हे वर्ष भारतासाठी खूप महत्वाचे आहे. कारण यंदा स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव म्हणजेच 75 वे वर्ष सुरु होत आहे. आपल्या महानायकांशी संबंधित ठिकाणांची माहिती घेण्यासाठी योग्य वेळ आहे. मुंगेरच्या जयराम विप्लव यांनी तारापुर शहीद दिवसावर लिहिले आहे, त्यांचा धन्यवाद, असे मोदी म्हणाले.

”आपल्याला येणाऱ्या काळाला नवीन आशा व नाविन्याने भरायचं आहे. आपण मागील वर्षी असाधरण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षात देखील कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला अधिक गतीने पुढे न्यायचं आहे. असं देखील यावेळी मोदी म्हणाले.