राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही-मोदी

0

नवी दिल्ली-सध्या निवडणुकीच्या तोंडावर देशभरात राम मंदिराचा मुद्दा जास्त चर्चेत आहे. आरएसएस, विश्व हिंदू परिषद, शिवसेना आदींसह विविध संघटनांकडून राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी होत आहे. दरम्यान याबाबत प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले आहे. राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

राम मंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतरच अध्यादेशाचा विचार होईल असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षातली पहिली मुलाखत दिली आहे. त्याच मुलाखतीत त्यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय अध्यादेश काढला जाणार नाही असे म्हटले आहे.