कोरोनाकाळातील देशवासीयांचा संयम अभूतपूर्व: मोदींची ‘मन की बात’

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज रविवारी ३० रोजी ६८ वा ‘मन की बात’ पार पडला. यात त्यांनी संपूर्ण देशवासीयांशी संवाद साधला. कोरोनाकाळात नागरिकांमध्ये जबाबदारीचे भान दिसून आले. संयम तर अभूतपूर्व होते. अनेक धार्मिक कार्यक्रमे रद्द केले, गणेशोत्सव सारखा उत्सव साधेपणाने साजरा होत आहे, यातून देशातील नागरिकांचा संयम दिसून आला. नागरिकांचा संयम कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रोत्साहन देणारा आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.