पंतप्रधानांचा मन की बात द्वारे देशवासीयांसोबत शतकीय संवाद

मुक्ताईनगर येथे खा. रक्षा खडसे यांच्यासह असंख्य महिलांचा सहभाग

भुसावळ प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑल इंडिया रेडियोवर प्रसारित होणाऱ्या ऐतिहासिक मन की बात’ या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाच्या लाईव्ह कार्यक्रमाचे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन पंतप्रधान यांचे विचार एकण्यास सहभागी झाले.

यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डी. एस. चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष पंकज कोळी, माजी नगराध्यक्ष नजमा तडवी, नायब तहसीलदार झांबरे, प्राचार्य वडस्कर तसेच नागरिकही उपस्थित होते.