नवी दिल्ली-काल ब्रिटनचे राजपुत्र प्रिन्स हॅरी आणि हॉलीवूड अभिनेत्री मेगन मर्केल यांचा शाही विवाह झाला. मोठ्या थाटात हा विवाह संपन्न झाला. या लग्नासाठी जवळपास ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. शाही लोकांचा शाही विवाह तर असणारच यात काही शंका नाही. आज पर्यंत कधीही बघितलेला नसेल असा हा लग्न सोहळा ठरला. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा होता. दरम्यान या लग्नात वधूने घातलेल्या ड्रेसची किंमत पाहून आपण थक्क व्हाल. लग्नात वधूने घातलेल्या ड्रेसची किंमत थोडी थोडकी नाही तर अडीच कोटी इतकी आहे.
हॉलीवूड अभिनेत्री मेगन मर्केल यांनी त्यांच्या लग्नासाठी खास हा ड्रेस घेतला होता. लग्न लागल्यानंतर संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रस्ताच्या दोन्ही बाजूने लोकांची गर्दी होती.