क्रीडा शिक्षक महासंघातर्फे मुख्याधिकारी महेशजी वाघमोडे यांचा सत्कार

प्रतिनिधी । भुसावळ

महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांची नाशिक विभागातून अ वर्ग नगरपालिकापदी पदोन्नती झाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

 

शालेय शिक्षण घेत असताना ते स्वतः कुस्तीचे खेळाडू होते. सत्कार करतेवेळी म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडाशिक्षक व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदिप साखरे, दे.ना. भोळे महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. संजय चौधरी, महाराणा विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा तालुका समन्वयक राजेंद्र कुलकर्णी, भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन व भुसावळ हायस्कूलचे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक प्रमोद शुक्ला, सुशीलाबाई चौधरी माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुनील चौधरी आदी उपस्थित होते.

*क्रिडा क्षेत्राला चालना देणार*

भुसावळकरांच्या पाण्याची समस्या त्यांना अतिशय अवगत आहे त्याच्याबद्दल त्यांचे ज्ञान सखोल आहे आणि लवकरात लवकर याच्यावर उपाय योजना करू असे त्यांनी सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या खेळण्यासाठी मध्यवर्ती असलेले डी. एस. हायस्कूलचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान चांगले करण्याचे आश्वासन दिले . क्रीडा क्षेत्रासाठी आपल्याला नवीन अजून काय करता येईल हे जाणून घेतले. त्यांचे क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने आभार मानण्यात आले. मुख्याधिकारी यांच्या सोबत क्रीडांगणाच्या संदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली.