शिंदखेडा प्रतिनिधी ।
तालुक्यातील पाटण जि.प.शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका योजना अशोक पवार यांच्या सेवापूर्तीनिमित्त त्यांचा बिजासनी मंगल कार्यालयात नुकताच सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पं.स.चे माजी सभापती प्रा. सुरेश देसले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पवार यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते योजना पवार यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला जि.प.चे माजी अध्यक्ष तुषार रंधे, बाळासाहेब भदाणे, ज्ञानेश्वर भामरे, माजी आ. रामकृष्ण पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे संभाजीराव थोरात, किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, पं.स.चे सदस्य प्रा. डॉ. विशाल पवार, शिंदखेडा न.पं.चे गटनेते अनिल वानखेडे, गटशिक्षणाधिकारी डॉ. सी.के.पाटील, टीडीएफचे विभागीय अध्यक्ष संजय पवार, ग.स. बँकेचे माजी चेअरमन रवींद्र खैरनार, शिक्षण विस्तार अधिकारी सी. एस. खर्डे, केंद्रप्रमुख सी. जी. बोरसे यांच्यासह शहर परिसरातील प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक उपस्थित होते. आपल्या सेवा कार्यकाळात विविध लोकप्रतिनिधी, शिक्षण विभागाचे अधिकारी, सहकारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल योजना पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी योजना पवार यांनी आपल्या सेवाकाळात विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. सूत्रसंचालन तथा आभार कैलास शिंदे यांनी मानले.