बस दरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू

0

शिमला :- हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात एक प्रवासी बस खोल दरीत कोसळल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जन जखमी झाले असून त्यांना प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज (रविवार) सकाळी 8.45 सुमारास घडली.


 

हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली बस (एचपी -64-9097) ही दरीत कोसळली. यात ८ जणांचा मृत्यू तर १५ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस आणि सुरक्षा कर्मचारी बचाव कार्य करत आहेत. या बसमध्ये २५ ते ३० प्रवासी होते. हि बस मनवावरून धम्मला-सोलनला जात होती. या अपघात साडेतीन वर्षाच्या आस्तिक पुत्र प्रदीप थानाधार या मुलाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.