मुंबई: ‘Ralph Lauren’ या फॅशन ब्रँडचे सदिच्छा दूत असलेल्या प्रियांका- निकनं नुकतीच न्यूयॉर्क फॅशनविकमध्ये उपस्थिती लावली. या फॅशनविकनंतर प्रियांका आणि निकचं फोटोशूटदेखील केला.
मात्र प्रियांका- निकचं फोटोशूट वेगळ्याच कारणानं चर्चेत आलं आहे. प्रियांकानं आपली खास मैत्रीण मेगन मार्केल आणि प्रिन्स हॅरीसारखंच फोटोशूट केल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे ज्या फोटोग्राफरनं मेगन आणि प्रिन्स हॅरी यांच्या शाही लग्नातील फोटो काढले त्याच फोटोग्राफरकडून प्रियांका आणि निकनं फोटो काढून घेतले आहे. मेगन आणि प्रियांका या दोघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.