निर्वासितांची परिस्थिती मन हेलावणारी-प्रियांका चोप्रा

0

मुंबई – जागतिक निर्वासित दिनानिमित्त बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ट्विटरवरून स्थलांतरीत रोहिंग्याच्या मुलांनी शेअर केलेल्या कथा ऐकून हृदयद्रावक कहानी असल्याचे म्हटले आहे. या वर्षी स्थलांतरीत रोहिंग्यांच्या एका तळाला (कॅम्प) तिने भेट दिली होती. तिथे भेट दिल्यानंतर तिला दिसलेल्या विदारक परिस्थितीची माहिती प्रियांकाने शेअर केली आहे. युनिसेफने यासाठी राजदूत म्हणून निवडल्यास त्यांच्या हक्कासाठी प्रयत्न करण्याची तिची इच्छा आहे.

गेल्या १२ वर्षांपासून प्रियांका चोप्रा युनिसेफच्या कार्यात सक्रिय सहभाग घेत आहे. सध्या प्रियांका अमेरिकेत आहे. बुधवारी रात्री तिने ट्विटर याबाबतच्या पोस्ट शेअर केल्या. जॉर्डन आणि बांगलादेश येतील काही स्थलांतरीत मुलांच्यासोबतचा एक व्हिडिओही तिने शेअर केला आहे.

आज जागतिक स्थलांतरीत दिवस आहे. सध्या जगात ६ कोटी ५० लाख लोक स्थलांतरीत असून त्यांना जबरदस्तीने त्यांच्या घराबाहेर रहावे लागत आहे. जॉर्डन आणि बांगलादेशच्या काही स्थलांतरीत मुलांना मी भेटले, त्यावेळी त्यांनी आई-वडील, मित्र, नातेवाईक कसे आपल्यापासून दुरावले गेले त्याची माहिती सांगितली. त्यांना पुरेसे जेवणही मिळत नाही, त्यांच्या शिक्षणाचे राहण्या-खाण्याच्या प्रचंड समस्या आहेत.