प्रियांका गांधींनी सांगितले वाराणसीतून न लढण्याचे कारण

0

वाराणसी: उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून मोदी विरोधात कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रियांका गांधी यांनी वाराणसीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला नाही. त्याचे कारण त्यांनी दिले आहे. प्रियांका गांधी यांनी वाराणसीतून न लढण्याबाबत खुलासा केला आहे. प्रियांका गांधी यांनी माझ्यावर उत्तर प्रदेशातील ४१ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी आहे. या ४१ मतदार संघात कॉंग्रेसच्या उमेदवारांना निवडणूक आणण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याने स्वत: निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असे सांगितले. यावर्षी प्रियांका गांधी राजकारणात अधिकृतरित्या उतरल्या आहेत. त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आलेली आहे.