अशा प्रकारे ‘देसी गर्ल’ बनल्या पहिल्या ग्लोबल सेलिब्रिटी !

0

मादाम तुसाद-बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या लोकप्रियतेने ‘देसी गर्ल’ मादाम तुसाद संग्रहालयात पोहचवले आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क स्थित मादाम तुसाद संग्रहालयात प्रियंकाचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे. केवळ इतकेच नाही तर लवकरच लंडन, सिडनी आणि आशियातही तिचा मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. याचसोबत प्रियंका मादाम तुसादच्या चार संग्रहालयात जागा मिळवणारी पहिली ग्लोबल सेलिब्रिटी बनली आहे. आत्तापर्यंत केवळ अमेरिकन गायिका व अभिनेत्री व्हिटनी ह्युस्टन एक अशी सेलिब्रिटी होती, जिचे मादाम तुसादच्या तीन संग्रहालयात मेणाचे पुतळे होते.

प्रियंकाने न्यूयॉर्कस्थित मादात तुसाद संग्रहालयाला भेट दिली. याठिकाणी स्वत:चा मेणाचा पुतळा पाहून तिला खूप आनंद झाला. आपल्या सोशल अकाऊंटवर या मेणाच्या पुतळ्यासोबतचे अनेक फोटो व व्हिडिओ तिने पोस्ट केले आहेत.