नवी दिल्ली – प्रियंका गांधी यांची काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीसपद निवड झाल्याने त्या राजकारणात औपचारिकरीत्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्या आज येथे होणार आहे. दरम्यान, लखनौ येथील रोड शो पूर्वी प्रियंका गांधी यांचे सोशल मीडियावरील प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटरवही आगमन झाले आहे. प्रियंका गांधी यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट आज ११ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहे.
प्रियंका गांधी वाड्रा या नावाने प्रियंका गांधी यांचे ट्विटरवरी अधिकृत अकाऊंट सुरू झाले आहे. त्यासंदर्भातील माहिती काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांनी अद्याप कुठलेली ट्विट केलेले नाही. आज ट्वीटर सुरु होऊन काही तास उलटत नाही, तोपर्यंत २८ हजार फॉलोअर्स झाले आहे.