मोदी फक्त कॉंग्रेसवर टीका करतात, स्वत:काय केले हे सांगत नाही: प्रियांका गांधी

0

फतेहपूर : काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये काँग्रेसच्या निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी गांधी

कुटुंबीयांवर सातत्याने टीका करत असतात त्याला प्रियांका गांधी यांनी उत्तर दिले आहे. मोदी फक्त कॉंग्रेसवर टीकाच करतात मात्र स्वत: काय केले याबद्दल काहीही सांगत नाही अशी टीका प्रियांका गांधी यांनी केले आहे. नेहरुजींनी काय केलं? इंदिराजींनी काय केलं? यावरच त्यांचे ५० टक्के भाषण अवलंबून असते. पण यांनी गेली पाच वर्ष काय केले, हे मात्र ते सांगत नाहीत’ असे प्रियंका गांधी यांनी सांगितले आहे. तुमच्या

समस्यांबद्दल बोलणारे आणि त्यावर उपाय शोधणारे राजकारण निवडा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. केवळ आपल्या क्षेत्रासाठी नाही, आपल्या गरजांपुरते नाही तर आपल्या मुलांच्या भविष्याला मजबूत करण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी योग्य सरकार निवडण्याचं आवाहनही त्यांनी केले.