राहुल गांधी भारतीय असल्याचे पुरावे देण्याची गरज नाही: प्रियांका गांधी

0

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा भारतीय नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे. भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत तक्रार दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस पाठविली आहे. यावर माध्यमांनी कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना प्रश्न केले असता, त्यांनी राहुल गांधी या देशाचे नागरिक आहे हे सिद्ध करायला नवीन पुरावे देण्याची गरज नाही. त्यांचा जन्म भारतात झाला, ते लहानाचे मोठे भारतात झाले. त्यांच्या नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून फालतू राजकारण केले जात असल्याची टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.


https://janshakti.online/new/rahul-gandhi-on-the-issue-of-citizenship-notice-from-the-ministry-of-home-affairs/