प्रकल्प, संशोधनाला मदतीसह नोकरीसाठीही संधी

0

जळगाव : एसएसबीटी महाविद्यालयाची स्थापना 1983 साली माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाली. या महाविद्यालयामध्ये सुरूवातीला फक्त तीन कोर्सेस होते. सिव्हील, इंजीनिअरींग आणि प्रॉडक्शन इंजीनिअरींगसाठी विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता 180 होती. आज महाविद्यालयात बायोटेक, केमीकल, सिव्हील, कॅम्प्यूटर, इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल, आयटी, इ&टीसी असे आठ इंजीनिअरींग कोर्सेस आहेत. कॉम्प्यूटर सायन्स इंजीनिअरींग इलेक्ट्रीकल आणि एमबीए असे दोन पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रम आहेत. 3 हजार विद्यार्थ्यांमध्ये 30 टक्के मुली तर 70 टक्के मुलांचा समावेश आहे. 350 मुली वसतीगृहात राहतात. दोन मुलांची वसतिगृहे असून त्यांची क्षमता 750 आहे. आमच्याकडे 25 सदस्य पीएच.डी. झालेले असून दोन वर्षांत आणखी तिघांची पीएच.डी. पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. पीएच.डी. पूर्ण केलेल्या प्राध्यापकांची एवढी मोठी संख्या असलेले उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात अन्य कोणतेही महाविद्यालय नाही. या महाविद्यालयाने आतापर्यंत तीनवेळा एनबीए (नॅशनल बोर्ड ऑफ अ‍ॅक्रेडेशन) मानांकन मिळवलेले आहे. नॅक (एनएएसी) सप्टेंबर 2016 पासून पाच वर्षासाठी मिळालेले आहे. दहा वर्षापासून हे अ‍ॅक्रेडेशन मिळालेले एकमेव एसएसबीटी महाविद्यालय उत्तर महाराष्ट्रात आहे.

एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात पाच वर्षापासून कॅम्पसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळवून दिली असून 1 हजार 200 विद्यार्थ्यांना नोकर्‍या प्राप्त झाल्या आहेत. दरवर्षी जवळपास 50 हून अधिक कंपन्या कॅम्पसमध्ये सहभाग नोंदवतात. यावर्षी आत्तापर्यंत 25 कंपन्यांनी भेट देऊन 130 मुलांची निवड केली आहे . काही मुलांना उच्च शिक्षणाची आवड असल्यामुळे विविध उपक्रम राबविले जातात. स्पर्धा परीक्षा, मुलाखत कौशल्यांसह इतर गोष्टींची माहिती दिली जाते. त्यामुळे त्यांना मुलाखतीसाठी अडचण भासत नाही. सर्व प्रकारचे खेळ उपलब्ध करून दिले आहेत. सहा वर्षात 4 वेळा या महाविद्यालयाची टॉप 10 मध्ये निवड झाली आहे. हे अभियांत्रिकी महाविद्यालय असले तरी खेळातही चांगल यश प्राप्त केले आहे. महाविद्यालयात आधुनिक व्यायामशाळा असून तज्ञ प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांकडे चांगले प्रकल्प असतील तर प्रोत्साहन निधी उपलब्ध करण्याची संधी आहे. उत्कृष्ट 5 प्रकल्पासाठी प्रत्येकी एक लाख रूपयांची मदतही केली जाते. प्रकल्प स्पर्धेत सहभागासाठीसुद्धा निधी दिला जातो. प्राध्यापकांसाठी ’श्रमसाधना संशोधन योजना‘ राबवून प्राध्यापकांच्या संशोधन प्रकल्पासाठी निधी दिला जातो. काही मुलांना शिक्षण घेणे परवडत नाही, त्यांना सीईटीच्या परीक्षेत चांगले गुण असतात; अशा विद्यार्थ्यांंना फी मध्ये 25 टक्के, 15 टक्के आणि 10 टक्के सुट मिळतेे. गरीब मुलांसाठी ‘श्रमसाधना शिष्यवृत्ती योजने’तून मदत केली जाते. शासनाच्या शिष्यवृत्तीही मिळतात .

येणार्‍या काळात एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय ‘सर्वोत्कृष्ट केंद्र’ होण्याचा मानस असून उत्तर महाराष्ट्र विभागात सर्वात टॉपचे महाविद्यालय म्हणून याची ओळख व्हावी यासाठी प्रयत्न आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे संशोधन, प्रकल्पासारख्या इतर गोष्टींसाठी खासगी संस्थांकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
-प्राचार्य डॉ. के.एस.वाणी

यंदापासून डी फार्मसी अभ्यासक्रम
‘श्रमसाधना एसएसबीटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी’ च्या माध्यमातून या वर्षापासून डी फार्मसी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. काही वर्षात बी फार्मसी हा अभ्यासक्रमही सुरू करणार आहोेत. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेतून सन 2016-17 मध्ये 100 विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके देण्यात आलीे. यावर्षी जवळपास 500 विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिकासाठी अर्ज केले हे प्रशिक्षण मोफत आहे. एनएसडीसी (नॅशनल स्कील डेव्हलपमेन्ट स्कीम) केंद्र घेण्याच्या विचारात आहोत. या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन मृद्रा लोन मिळवून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेम हे केंद्रही सुरू करण्याचा मानस एसएसबीटी महाविद्यालयाचा आहे.

एसएसबीटी महाविद्यालयात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना सर्वात अगोदर या महाविद्यालयातच प्रवेश का प्रवेश घ्यायचा आहे? याबाबत विचारून त्यांना प्रवेशा संदर्भात येणार्‍या अडचणी व कोणत्या शाखेत त्याप्रमाणे कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा याबाबत माहिती देण्याचे काम केले जाते असे, सह. प्राध्यापक तथा अ‍ॅडमिशन असोशिएट कृष्णा श्रीवास्तव यांनी सांगितले.
– कृष्णा श्रीवास्तव, सह. प्राध्यापक, मेकॅनिकल विभाग