मालमत्तेचे ऑनलाईन सर्वेक्षण

0

हिंगोली – पालिकेच्या हद्दीतील नागरिकांच्या मालमत्तेचे पालिकेकडून ऑनलाईन सर्वेक्षण होणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार हे सर्वेक्षण केले जाणार आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात त्यासाठी हे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात राहते घर, दुकाने, संस्था, औद्योगिक इमारत, सरकारी जागा, धार्मिक स्थळे, शाळा, अतिक्रमण, तहसील जागा, लीजवर घेतलेली जागा, पालिका कॉम्प्लेक्स आदींचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचा हा अभिनव उपक्रम असून, यात जिओग्राफिक इन्फॉरमेशन सिस्टिम प्रणाली आहे. यामध्ये भौगोलिक माहिती समाविष्ट केली जाणार आहे. माहिती देताना पालिकेच्या रेकॉर्डवर असलेली नावे सांगावी जेणेकरून तुमचे नुकसान होणार नाही. याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घेऊन अचूक माहिती सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांना द्यावी. यात आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, घरातील मोजमाप, बांधकाम कोणत्या वर्षी पूर्ण झाले आदी बाबींची सविस्तरपणे माहिती दिल्यास आपल्याला शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे.