‘प्रपोस डे’ विशेष ! तरुणीने दिला नकार आणि तरुणाने कापली हाताची नस

prapose day crime । तरुणाने प्रेमभंगापोटी ’प्रपोज डे’लाच ज्या तरूणीने नकार दिला तिच्या समोर हाताची नस कापून घेतली असल्याची खळबळ जनक घटना जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात उघटकीस आली आहे. मार्केट परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती.

 

याबाबद धक्कादायक माहिती अशी कि,  एका तरुणाला तरुणीने नकार कळवला. त्यामुळे नाराज झालेल्या तरुणाने बुधवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता शहरातील फुले मार्केटमध्ये ब्लेडने स्वत:च्या हाताची नस कापली. यावेळी ज्या तरुणीवर त्याचे प्रेम होते ती देखील समोर उभी होती. तिच्याकडे पाहात असतानाच त्याने नस कापल्यामुळे या तरुणीला चांगलाच धक्का बसला. हा प्रकार लक्षात येताच काही लोकांनी रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.