बंगळूर-सत्ता स्थापनेवरुन कर्नाटकात निर्माण झालेला पेच न्यायालयात पोहोचला आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज निकाल सुरु आहे. यात न्यायालयाने भाजपला उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहे. उद्या ४ वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केल्याने भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसाची मुदत देण्यात आली आहे.
राज्यपालांचा निर्णय चुकीचा
कॉंग्रेस व जेडीएसने निवडणूकोत्तर आघाडी करत सत्ता स्थापेचा दावा केला आहे. मात्र राज्यपाल यांनी त्यांचा दावा फेटाळत भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले. यावरून आघाडीने न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यपालांचा निर्णय चुकीचा आहे असा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे.
आम्हाला निमंत्रण द्या
दरम्यान आम्हाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण द्या उद्याच बहुमत सिद्ध करू असा दावा कॉंग्रेसच्या वकिलांनी केले आहे. सिंघवी व कपिल सिब्बल कॉंग्रेस, जेडीएस हे वकील आहे. तर रोहतगी भाजपचे वकील आहे. देशातील तीन नामांकित वकील म्हणून यांना ओळखले जाते.
भाजपची कसोटी लागणार
भाजप जवळ १०४ संख्याबळ आहे तर बहुमतसाठी ११२ संख्याबळाची आवश्यकता आहे. उद्या ४ वाजेपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश असल्याने भाजपची कसोटी लागणार आहे.