सावदा येथे डेंग्यू दिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांत जनजागृती
सावदा (प्रतिनिधी) – दि 16 मे हा सर्वत्र डेंग्यू दिन म्हणून साजरा करण्यात येतो याच डेंग्यू दिनाच्या पूर्वसंध्येला दि 15 मे रोजी सावदा येथे रोजी उपक्रमांद्वारे याबाबत जागृती करण्यात आली जिल्हा हिवताप अधिकारी श्री डॉ. डी. के. लांडे यांचे मार्गदर्शनाने डॉ. दिपक पाटील व तालुका पर्यवेक्षक श्री. विजय नेमाडे यांचे सूचने प्रमाणे
डेंग्यू दिनानिमित्त हस्त पत्रके वाटप, कन्टेनर सर्वेक्षक, पाणी साठे झाकून ठेवा, घरा समोरील नाल्या वाहत्या कर खिडक्यांना जाळ्या बसवणे, घरासमोर पाणी साचू देऊ नये, एक दिवस कोरडा दिवस पाळणे अश्या प्रकारे जनजागृती करून नागरीकांना सांगण्यात आले या अभियानात आरोग्य सेवक व आरोग्य सेवीका सहभागी झाले