दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात भुसावळ राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने जनजागृती कार्यशाळा संपन्न

भुसावळ l G 20 च्या मार्गदर्शनानुसार दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात भुसावळ राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने जनजागृती कार्यशाळा संपन्न

G 20 च्या मार्गदर्शनानुसार कवयत्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे “ऊर्जा स्रोतांचे संवर्धन, पर्यावरण पूरक जीवनशैली” या विषयावर एक दिवसीय जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर पी फालक होते व प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. डी.एस.राणे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वक्ते प्रा. डॉ.डी.एस. राणे यांनी आपल्या व्याख्यानामध्ये ‘ऊर्जा स्रोतांचे संवर्धन, पर्यावरण पूरक जीवनशैली’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी पारंपारिक इंधना ऐवजी अक्षय ऊर्जेचा वापर करण्याच्या मोलाचा सल्ला दिला. तसेच आपल्या व्याख्यानामध्ये वेगवेगळ्या ऊर्जा स्रोतांचे माहिती दिली व पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे पर्यावरण पूरक जीवनशैली जगत असताना कमीत कमी ऊर्जास्रोतांचा वापर आपण करत होतो असे जीवन जगण्याचा सल्ला त्यांनी दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी फालक यांनी या जनजागृती पर कार्यशाळाचे कौतुक केले आणि अध्यक्ष भाषणामध्ये त्यांनी सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जाचा वापर आपण जास्तीत जास्त करावा असे आव्हान केले आणि ही माहिती सर्व स्वयंसेवकांनी आपल्या प्रत्येक गावात प्रसार आणि प्रचार करावी तरच ही कार्यशाळा यशस्वी झाली असे मानता येईल असे मत या कार्यशाळेमध्ये मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.आर.बी ढाके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ.जे.बी. चव्हाण यांनी मानली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रा. से. य. कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. आर.बी ढाके , प्रा. डॉ.जगदीश चव्हाण , प्रा. आर.डी.भोळे व रा. से. य. चे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी प्रयत्न केले असे प्रसिद्धी प्रमुख प्रा. डॉ. संजय चौधरीसर कळवितात.