पिंपरी-चिंचवड :- मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या कारकीर्दीला चार वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार मनोहर भोईर उपस्थित होते.
विविध प्रश्नांवर आवाज उठवून केंद्र सरकारचे लक्ष वेधले
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे हे गेली चार वर्ष आपल्या मावळ लोकसभा मतदार संघातील व देशाशी निगडीत असलेल्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. तसेच लोकसभेमध्येही त्यांची गेली चार वर्ष कार्यक्षम खासदार म्हणून ओळखले जातात. गेली चार वर्षा मध्ये त्यांनी लोकसभेचे सदस्य झाल्यापासून संसदेमध्ये आत्तापर्यंत ९३५ तारांकित व अतारांकित प्रश्न मांडले, तसेच २५५ वेळा प्रत्यक्ष चर्चेत त्यांनी सहभाग घेतला, तर १६ महत्वाच्या विषयांवर खाजगी विधेयके मांडली असुन त्यांची लोकसभेतील एकूण उपस्थिती ९५% राहिली असून १००% स्थानिक खासदार निधी खर्च केला आहे.
विधानसभा मतदार संघात सर्वाधिक संपर्क असणारे खासदार
पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत – खालापूर, उरण, पनवेल या सहाही विधानसभा मतदार संघात सर्वाधिक संपर्क असणारे खासदार म्हणुन ओळखले जाते. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सातात्याने सहभाग असतो या आगोदर त्यानी प्रत्येक वर्षाचा कार्याचा अहवाल सतत तीन वर्ष प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या कारर्कीदीला चार वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्या चौथ्या वर्षाचा कार्यअहवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.