पुलगावातील केंद्रीय दारुगोळा भांडारात स्फोट; सहा जण ठार

0

वर्धा- सैन्य दलासाठी बॉम्ब, हातबॉम्ब, अग्निबाण, दारूगोळा, अद्ययावत शस्त्रास्त्रांचा साठा करणाऱ्या वर्धा येथील पुलगावातील केंद्रीय दारूगोळा भांडारात जुने बॉम्ब निकामी करताना स्फोट झाला आहे. या स्फोटात सहा जण ठार तर ११ जण जखमी झाले आहे.

आज सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मुदतबाह्य बॉम्ब निकामी केले जात होते. यादरम्यान सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात ११ जण जखमी झाले आहेत. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून या घटनेचा तपास सुरु केला आहे. जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरु असून यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. निकामी बॉम्बचे जस्त कथिल अॅल्युमिनियम वेचण्यासाठी गावातील ग्रामस्थ फायरिंग रेंजमध्ये जातात, असे सांगितले जाते. यासाठी काही शेतमजूर तिथे गेले होते, असे समजते.

सैन्याच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या खमरिया येथील ऑर्डिनन्स फॅक्टरीतील मुदतबाह्य बॉम्ब निकामी करण्यासाठी पुलगाव येथे आणली होती. आज सकाळी बॉम्ब नेत असताना स्फोट झाला. मृतांमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरीतील दोन कर्मचाऱ्यांसह, दोन कामगाराचा समावेश आहे.