भारताने आमच्या विरोधात पुरावे द्यावे; इम्रान खानची पहिली प्रतिक्रिया

0

इस्लामाबाद- पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे दहशतवादी हल्ल्यानंतर निषेध नोंदवण्याऐवजी त्यांनी भारतालाच खडे बोल सुनावले आहेत. भारतावर हल्ला करून पाकिस्तानला काय फायदा होणार ?, पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही, कुठल्याही पुरावे नसताना भारत पाकिस्तानवर आरोप करत सुटला आहे. भारताने पहिल्यांदा आम्हाला पुरावे द्यावेत, मग आम्ही कारवाई करू, जर भारत युध्दाच्या तयारीत असेल तर आम्हीही कोणत्याही गोष्टीत मागे नाही अशी धमकीही इम्रान खानने दिली आहे.

तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावर आमची भारताबरोबर चर्चेची तयारी असल्याचे ते म्हणाले आहेत. स्वतः पाकिस्तान दहशतवादाचा शिकार बनलेला आहे. आजपर्यत लाखो पाकिस्तानचे नागरिक दहशतवादी हल्ल्यात दगावले आहे. आमचा देश आता प्रगतिच्या मार्गावर असून आम्ही दहशतवादाला खतपाणी घालत नसल्याचे इम्रान खान यांनी सांगितले आहे. परंतु जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वतः पुलवाम्यात घडवून आणलेल्या हल्ल्याची कबुली दिली आहेत. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान यासंदर्भात भारताकडे पुरावे मागत असल्याने देशपातळीवरून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या धर्तीवरूनच दहशतवाद पोसला जातोय. दहशतवाद्यांना पाकिस्तान हा देशच आश्रय देत असल्याचे नेहमीच सिद्ध झाले आहे. पुलवामा हल्ल्याचा साधा निषेध नोंदवण्यापेक्षा इम्रान खान यांनी भारतालाच धमकावण्याचा प्रयत्न केला. भारतात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला झाल्यास राजकीय लाभ मिळू शकतो.

मात्र पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर दबाव आला असून, भारताकडूनही आक्रमक कारवाईसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बाळगलेले मौन सोडत आज देशाला संबोधित केले. या संबोधनामध्ये इम्रान खान यांनी पुलवामा हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचा दावा फेटाळून लावला.