झांसी – पुलवामा दहशतवादी हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देणार असल्याची चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिली आहे. झांसी येथील जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला चांगलंच ठणकावले आहे. भारतीय लष्कराला प्रत्युत्तरादाखल कारवाईसाठी वेळ आणि स्थळ ठरवण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहितीही पंतप्रधान मोदींनी दिली. जवानांनी देशासाठी दिलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. पुलवामाच्या हल्लेखोरांना किंमत चुकवावीच लागणार, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले. काल अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 44 जवानांना वीरमरण आले. त्यानंतर संपूर्ण भारतात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट पसरली आहे.
राजनाथसिंगानी दिला खांदा
शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बडगाममध्ये श्रद्धांजली वाहिली. यानंतर आता या जवानांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहेत. यावेळी राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना खांदा दिला.