जळगाव प्रतिनिधी ।
शाळांना उन्हाळी सुद्धा जाहीर झाल्यानंतर अनेक जण मुलांना घेऊन बाहेरगावी जाण्याचा प्लॅन करतात. तसेच काही जण फिरण्याचा प्लॅन करतात. यादरम्यान, रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येतेय. दरम्यान, यातच प्रवाशांची वाढती संख्या लक्ष्यात घेऊन मध्य रेल्वेकडून अनेक विशेष रेल्वे गाड्या चालविल्या जात आहे. यातच पुणे ते अजनी अशी एकेरी सुपरफास्ट स्पेशल ट्रेन सुरू करण्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. ०१४४३ क्रमांकाची ही ट्रेन २३ एप्रिल २०२३ रोजी पुणे जंक्शनवरून २२.०० वाजता सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ती १२.५० वाजता अजनी येथे पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
या स्टेशनवर थांबा ?
ही गाडी दौंड चौर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा या मार्गावरील स्थानकांवर थांबेल. त्याच्या संरचनेत दोन एसी-३ टायर कोच, नऊ स्लीपर क्लास कोच, नऊ जनरल सेकंड क्लास कोच आणि दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनचा समावेश आहे.