पुणे शहर ठरले भारतातील पहिले लाईटहाउस शहर

0

पुणे- अर्बन मोबिलिटी लॅबसाठी पुण्याला भारतातील पहिले लाइटहाउस शहर म्हणून निवडले गेले आहे. रॉकी माऊंटन इंस्टिट्यूट (आरएमआय) आणि एनआयटीआय या आयोगाने केलेल्या सर्वेक्षणानुसार पुण्याला अर्बन मोबिलिटी लॅबसाठी भारतातील पहिले लाइटहाउस सिटी म्हणून निवडले गेले आहे.

पुणे म्युनिसिपल कॉरपोरेशन (पीएमसी) यांच्या भागीदारीत आरएमआयच्या नेतृत्वाखालील शहरी मोबिलिटी लॅबद्वारे पुणे शहरासाठी नवकल्पित मोबिलिटी सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी भारत आणि आठ बहु-भागधारक कंपनीचा सहकार्य मिळणार आहे. यात अशोक लेलँड, लिथियम सिटी टेक्नोलॉजी, महिंद्रा अँड महिंद्रा, ओला कॅब, रिडर, सन मोबिलिटी, टाटा मोटर्स आणि ट्रान्झिट इंटेलिजेंस यांचा सहभाग आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सहा क्षेत्रांचा उपयोग होणार आहे. रहदारी आणि पार्किंग व्यवस्थापन, नॉन-मोटारीकृत वाहतूक, सार्वजनिक वाहतूक, मध्यवर्ती सार्वजनिक वाहतूक, बुकिंग आणि पेमेंट यात गतिशीलता येणार आहे.