पुणे लोकसभेच्या जागेवरून मविआत रस्सीखेच, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत

पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जास्त ताकद आहे त्यामुळे लोकसभेची जागा आम्हाला मिळावी अशी इच्छा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली होती. पण आता या लोकसभेच्या जागेवरून ठाकरे गटाने आपली भूमिका मांडली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत पुणे लोकसभेच्या जागेवद दावा ठोकला आहे.

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, कसेल त्याची जमिन या प्रमाणे जो जिंकेल त्याची जागा. हे सूत्र ठरले तर “कसबा” प्रमाणे पुणे “लोकसभा” पोट निवडणुक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल! जय महाराष्ट्र! असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.

जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त आहे तिथे त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. पुणे शहर व जिल्ह्यात नेहमीच आमची ताकद राहिली आहे. त्यामुळे ती जागा कोणाला सोडणे हा वाद होऊ शकत नाही. निवडणुकीची रणनिती ठरवताना जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं अजित पवार म्हणाले.