गिरीश बापट यांच्या जाण्याने पुण्याचे वैभव हरपले – उदय सामंत
पुणे | पुण्याचे लोकप्रिय खासदार तसेच महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते मा.गिरीश बापट यांच्या निधनाने राजकारणाच्या पलीकडे जावून मैत्री जोपासणारा दिलदार मित्र,भारतीय जनता पक्षाच्या संघटन वाढीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत धडपडणारा तरुण नेता महाराष्ट्राने (Pune) गमावला असल्याची भावना महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली,ते स्व.गिरीश बापट यांच्या अस्थिदर्शनासाठी व बापट कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पुण्यात आले होते.
ते पुढे म्हणाले की, गिरीश बापट साहेब म्हणजे सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला आपलेसे वाटणारे, पक्षाच्या पलीकडे जावून राजकारणातल्या विविध स्तरांवर काम करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांशी मैत्री जोपासणारे उमदे नेते.पुणे शहराच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा होता,मी सत्ताधारी पक्षात असतांना, (Pune) ते विरोधात असतांनाही मी आयोजित केलेल्या प्रत्येक कार्यक्रमांना बापट साहेब उपस्थित असायचे, मनाचा मोठेपणा असलेले नेते म्हणून त्यांची सर्वदूर ओळख होती, युवा सेनेचे नेते किरण साळी यांनाही अगदी शिवसैनिक असतानाच्या काळापासून गिरीश बापटांनी पाठबळ दिलं. असे बापट कुटुंबीयांनी या भेटीदरम्यान सांगितले,त्यांनी जोडलेल्या प्रत्येक कार्यकर्ता आज शोकमग्न असून शिवसेना पक्ष बापट कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असेही ते म्हणाले.
यावेळी युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव किरण साळी, (Pune) शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश(बाप्पू)कोंडे,शिवसेना उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर,भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर व शिवसेना,भाजपा पक्षाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.