पुणे-मुंबई रेल्वे मार्ग १० दिवसांसाठी बंद !

0

पुणे : मध्य रेल्वेकडून मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्रामध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी पुढील दहा दिवस रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कोयना एक्स्प्रेस पुण्यातूनच सोडण्यात येणार असून पुणे-मुंबई दरम्यान धावणारी प्रगती एक्स्प्रेस 15 ऑक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी 5 ते 14 ऑक्टोबर काळाता दौंड-मनमाडमार्गे धावणार आहे. हुबळी-मुंबई, हैदराबाद, विशाखापट्टनम, नांदेड या गाड्याही मुंबईला न येता पुण्यापर्यंतच धावणार आहेत. तर हैदराबाद-मुंबई एक्सप्रेस, मुंबई पंढरपूर पॅसेंजर, मुंबई विजापूर पॅसेंजर या रद्द करण्यात आल्या आहेत.

ऐन सणासुदीच्या काळात रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात येणार असल्याने प्रवाश्यांची गैरसोय होणार आहे.