पुणे शहरासह ठिकठिकाणी बरसला पाऊस

0

पावसाने नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा
पुणे :- गेल्या काही दिवसांपासून पुण्याचे तापमान मोठ्याप्रमाणावर वाढले होते. आज पुण्यामध्ये अचानक आलेल्या पावसाने भर उन्हाळ्यात शहरातील वातावरण काही प्रमाणात नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे शहरातील वातावरण काही प्रमाणात थंड झाले. पिरंगुटमध्ये गारांचा पाऊस पडला. पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील भोसरी, चाकण कासारवाडी,डेक्कन, एरंडवणे, पाषाण, शिवाजीनगर या भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. तसेच मावळ भागात तळेगाव, वडगाव परिसरात पाऊस पडला. यावेळी वाऱ्यासह विजेंच्या कडकडात पावसाला सुरुवात झाली. लहानग्यांनी तसेच तरुणांनी या अचानक आलेल्या पावसामध्ये भिजण्याचा आनंद लुटला.

शहरातील काही प्रमाणात थंडगार वातावरण
आज पुणे शहर परिसरात कमाल तापमान 36.8 तर किमान 22.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. वातावरण काही प्रमाणात ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. सकाळपासून उन्हाने कहर केला होता. शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. शरीर थंड करण्यासाठी आईस्क्रीम, उसाचा रस, लिंबू सरबत मिळणा-या ठिकाणी नागरिक एकच गर्दी करीत होते. मात्र पाऊस पडल्यानंतर ही गर्दी काहीशी कमी झाली. तुरळक ठिकाणी पडलेल्या पावसामुळे शहर परिसरातील वातावरण काही प्रमाणात थंड झाले आहे.