मुंबई: २६ जुलै ते ९ ऑगस्ट दरम्यान मुंबई, पुणे मार्गावर धावणाऱ्या सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या बंद राहणार आहे. या मार्गावरील तांत्रिक दुरुस्ती, व काही कामासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या मुळे चाकरमान्यांना मोठा फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे. या कामामुळे इतर गाड्यांना फटका बसणार आहे.
लोणावळा ते कर्जतदरम्यान हे दुरुस्तीचं काम हाती घेतले जाणार आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. तर, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आलेले आहेत. मुंबईहून सुटणाऱ्या कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस पुण्याहून सुटणार आहेत. त्यामुळे या आठ दिवसांत प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
असे आहेत वाहतुकीतील बदल, पुणे-भुसावळ गाडी मनमाड मार्गे धावणार.पुणे-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस रद्द. नांदेड-पनवेल ही गाडी पुण्यापर्यंतच धावणार. पुणे ते पनवेल मार्गावर धावणार नाही. कोयना, सह्याद्री, महालक्ष्मी गाड्या पुण्याहून सुटणार. पुणे-पनवेल-पुणे शटल सेवा सुद्धा रद्द
>