असा आहे पुणे विद्यापीठ पदवीप्रदान सोहळ्यातील पेहरावा !

0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११४ वा पदवीप्रदान सोहळा आज पार पडत आहे. या समारंभासाठी यावर्षापासून ‘ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढऱ्या रंगाचा पायजमा, उपरणे, फक्‍त मान्यवरांसाठी पूर्वीप्रमाणेच पगडी असा पोशाख आहे.

यंदापासून काळ्या गाऊन ऐवजी ऑफ व्हाईट क्रीम कलरचा झब्बा अथवा नेहरू शर्ट, पांढऱ्या रंगाचा पायजमा, उपरणे असा ड्रेसकोड ठेवण्यात आला. मात्र या सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी बदललेल्या ड्रेसकोडला अत्यंत अल्प प्रतिसाद दिला आहे. काही विद्यार्थी तर जुनाच काळा गाऊन घालून फोटो काढत असल्याचे चित्र दिसून आले.

पदवीप्रदान समारंभात विविध विद्या शाखांमधील पदव्युत्तर स्तरावरील एकूण २१ हजार ३६६ पीएचडीच्या ४४१ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. ७० सुवर्णपदक प्रदान केले जाणार आहे. त्यानंतर पदवी स्तरावरील ८० हजार ६१३ विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे त्यांच्या महाविद्यालयांकडे पाठवण्यात येणार आहेत.