बीएससीचा पेपर फुटला

0

पुणे – बीएससीच्या दुसऱ्या वर्षाचा गणित लिनीयर अल्जेब्रा या विषयाचा पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली. हा पेपर आज सकाळी ११ वाजता झाला, मात्र काल रात्रीच काही विद्यार्थ्यांना वॉट्सपवरून हा पेपर मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पुणे विद्यापीठाने ही परीक्षा परत घ्यावी, अशी मागणी नाशिकच्या आम आदमी पार्टीन केली आहे. पुणे विद्यापीठा अंतर्गत बीएससी विषयाचे पेपर सुरू आहेत. मात्र हे पेपर फुटत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

१५०० रुपये दिल्यानंतर वॉट्सअप वर पेपर मिळत असल्याची धक्कादायक माहिती आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी दिली. आज बीएसीच्या दुसऱ्या वर्षाचा गणित लिनीयर अल्जेब्रा या विषयाचा पेपर होता, मात्र त्याची फास्ट कॉपी रात्रीच काही विद्यार्थ्यांना मिळाल्याचे दिसून आले.

पुणे विद्यपीठा अंतर्गत ही परीक्षा घेतली जात असून, महाविद्यालयात परीक्षा सुरू होण्याच्या २० मिनिटे आगोदरच पेपर ऑनलाइन मिळत असल्याची माहिती नाशिकच्या बिटको कॉलेजच्या प्राचार्यांनी दिली. मात्र आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेला पेपर आणि या विद्यार्थ्यांना मिळलेल्या प्रश्नपत्रिकेत साम्य असल्याची कबुली प्राचार्यांनी दिली. मात्र या संदर्भात विद्यापीठामार्फत चौकशी केली पाहिजे असे सांगत कॉलेज प्रशासनाने हात झटकले.

एकूणच राज्यात शिक्षण विभागाचा आनागोंदी कारभार याआधी देखील समोर आला आहे. एकीकडे बारकोड आणि ऑनलाइन माध्यमातून परीक्षा सुरक्षित पार पाडन्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे विद्यपीठाच्या दुर्लक्षामुळे शिक्षण विभागच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पेपर फुटीमध्ये सहभाग असलेल्या विद्यापीठातील अधिकाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी आता होत आहे.