१० दिवसात ‘राझी’ने केली इतकी कमाई

0

मुंबई : प्रदर्शनानंतरच ‘राझी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी करत आहे. ११ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. आज पर्यंत रिलीजच्या १० दिवशी म्हणजेच रविवारी आलिया भट आणि विकी कौशलच्या या सिनेमाच्या बक्कल कमाई केली आहे. आजपर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७७.४४  कोटींची कमाई केली आहे. मेघना गुलजार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे बजेट ४० कोटी इतके आहे.

पाचवा हिंदी चित्रपट

‘राझी’ने पहिल्या दिवशी ७.५३२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या दिवशी सुमारे ५०  टक्क्यांच्या वाढीसह सिनेमाने ११.३० कोटींची कमाई केली. ओपनिंग डेला सर्वाधिक कमाई करणारा २०१८  वर्षातील हा पाचवा हिंदी चित्रपट ठरला. उत्तम कथा, समीक्षकांकडून मिळालेले चांगले रेटिंग्स आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता येत्या काही दिवसात चित्रपटाची कमाई आणखी वाढण्याची आशा आहे.

१९७१  च्या भारत पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी या सिनेमाला आहे. आलिया भटने यात गुप्तहेराची भूमिका यात साकारली आहे. आलिया पाकिस्तानी सैनिकासोबत लग्न करुन पाकिस्तानात जाते आणि तिथून भारतासाठी माहिती मिळवण्याचे काम करते. ज्या पाकिस्तानी सैनिकासोबत आलियाचं लग्न होतं, त्याची भूमिका अभिनेता विकी कौशलने केली आहे. एका धाडसी तरुणीची भूमिका आलियाने यात केली आहे.

आलिया भट आणि विकी कौशलशिवाय सिनेमात जयदीप अहलावत, शिशिर शर्मा, रजित कपूर, सोनी राजदान, आरिफ झकारिया आणि अमृता खानव‍िलकर यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.