‘राझी’ने शंभर कोटींचा टप्पा केला पार

0

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असलेल्या ‘राझी’ चित्रपटाने अल्पावधीतच शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे. करण जोहरने याबाबत ट्वीट करत ‘आलिया आणि दिग्दर्शक मेघना गुलजार यांचे कौतुक केले आहे.

आलिया आणि विकी कौशल यांची मुख्य भूमिका आणि दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी आपल्या शैलीत ‘राझी’ची कहाणी प्रेक्षकांसमोर आणली. १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धासंदर्भात ही कथा आहे. ज्यात एका भारतीय गुप्तचराला आपल्या देशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टी महत्त्वाच्या वाटत नाहीत. गेल्या काही काळात आलेल्या महिला प्रधान चित्रपटांमध्ये राझीनं जवळजवळ सगळेच विक्रम मोडीत काढले आहेत.