नवी दिल्ली: केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले आहे. जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन होऊन ‘जम्मू-काश्मीर’ आणि ‘लडाख’ हे दोन केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले आहे. त्यानंतर देशात अनेक बदल झाले आहे. आता या भागात ऑल इंडिया रेडिओने आपल्या घोषणेतही बदल केला आहे.
यापूर्वी जम्मू, श्रीनगर आणि लेह या रेडिओ केंद्रांवरुन ‘रेडिओ काश्मीर’ अशी होणारी घोषणा होत होती. ही घोषणा आता यापुढे होणार नाही तर त्याऐवजी देशभरात होणारी ‘ऑल इंडिया रेडिओ’ किंवा ‘ये आकाशवाणी है’ अशी घोषणा ऑल इंडिया रेडिओकडून केली जाणार आहे. त्याचबरोबर जम्मू, श्रीनगर आणि लेह इथल्या रेडिओ केंद्रांची नावेही बदलली जाणार असून ती ऑल इंडिया रेडिओ जम्मू, ऑल इंडिया रेडिओ श्रीनगर आणि ऑल इंडिया रेडिओ लेह अशी केली जाणार आहेत.
जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन होऊन आजपासून अस्तित्वात आलेल्या जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशच्या नायब राज्यपालदाची गिरीशचंद्र मुम्रू यांनी तर राधा कृष्ण माथूर यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशाच्या नायब राज्यपालपदाची आज शपथ घेतली.