राफेल घोटाळ्यात मोदींनी मध्यस्थीची भूमिका निभावली ; राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

0

लखनौ- राफेल कराराच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी आज लखनौत पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल करारात मध्यस्थीची भूमिका निभावली असून त्याबाबतचा ई-मेल समोर आला आहे. कशा प्रकारे मोदींनी अनिल अंबानी यांनी ३० हजार कोटींचा कंत्राट दिला यावरुन ई-मेलचा पुरावा यावेळी राहुल गांधी यांनी दाखविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक भ्रष्ट्राचारी नेता आहे आहे असे आरोप यावेळी राहुल गांधींनी केला.

राफेल घोटाळ्यातील एक-एक मुद्दा हळूहळू समोर येत आहे. जर भाराष्ट्रचार झालेला नाही तर जेपीसीच्या चौकशीला सामोरे का जात नाही असा सवालही यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थित केला. यावेळी ‘सीएजी’च्या अहवालाचा उल्लेख (चौकीदार ऑडीटर जनरल) रिपोर्ट असा केला.

माझी जितकी चौकशी करायची आहे तेवढी करा, माझा कोणत्याही घोटाळ्यात सहभाग नाही. त्यामुळे मी चौकशीला घाबरत नाही असे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.