नवी दिल्ली-भाजप सरकारवर राफेल करारावरून सर्वत्र टीकेची झोड उठवली जात आहे. विरोध भाजपला लक्ष करून भष्ट्राचाराचा आरोप करीत आहे. विशेषतः काँग्रेसने राफेल करारावरुन भाजपला लक्ष केले आहे. दरम्यान या आरोपांवर अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवले आहे. ‘काही लोक, व्यावसायिक स्पर्धक काँग्रेसला चुकीची माहिती देत त्यांची दिशाभूल करत आहे’ असे अंबानींनी या पत्रात म्हटले आहे.
काँग्रेसच्या आरोपानंतर रिलायन्स धिरुभाई अंबानी समुहाचे अनिल अंबानी यांनी राहुल गांधी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी प्रत्येक आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. सर्व आरोप हे निराधार आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे. हा दुर्दैवी प्रकार आहे. राफेल विमानांची निर्मिती रिलायन्स द्वारे होत नसून सर्व ३६ विमाने फ्रान्समध्येच तयार केले जातील आणि तिथून हे विमान भारतात निर्यात केले जातील, असे त्यांनी सांगितले.
राफेल युद्ध विमान खरेदीत ४१ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. राफेलची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सच्या दासॉल्ट कंपनीने स्थानिक भागीदार म्हणून रिलायन्स डिफेन्सची निवड केली. १४ दिवसआधी स्थापन झालेल्या कंपनीला साहित्य निर्मितीचे कंत्राट देण्यात आले. केवळ आपल्या मित्रांना फायदा व्हावा म्हणून देशाच्या सुरक्षेशी खेळ करण्यात आला, असे आरोप काँग्रेसकडून केले जात आहे.