सत्तेसाठी राहुल गांधी फ्री सेक्सचीही घोषणा करतील; विचारवंत मधुपूर्णिमा किश्वर यांचे वादग्रस्त ट्वीट

0

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकांची तोंडावर सर्वच राजकीय पक्षांकडून घोषणाबाजी सुरु आहे. कॉंग्रेसकडून प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून घोषणांचा वर्षाव सुरू आहे. राहुल गांधींच्या या घोषणांवर टीका करतांना विचारवंत मधुपूर्णिमा किश्वर यांनी वादग्रस्त ट्वीट केले आहे. राहुल गांधी आता प्रौढांसाठी फ्री सेक्सचीही घोषणा करतील, असे वादग्रस्त ट्वीट किश्वर यांनी केले आहे.

राहुल गांधींनी नुकतीच बेरोजगारांना किमान वेतन देण्याची घोषणा केली. देशात काँग्रेसचे सरकार आल्यास जनेतेला विविध योजना देण्याचे राहुल गांधींकडून सांगण्यात येत आहे. २०१९ मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यास गरिबांना दरमहा निश्चित वेतन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राहुल गांधी यांनी महिलांसाठीही महत्त्वाचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनावर टीका करतांना मधुपुर्णिमा किश्वर यांनी वादग्रस्त ट्वीट केले आहे. किश्वर यांच्या या ट्विटवर नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र, या ट्विटला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत असून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.