नवी दिल्ली-पाच राज्यातील निवडणुका संपल्या आहेत. निवडणुकीच्या मॅरेथॉन प्रचारानंतर आता सुट्टी घालविण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बहिण प्रियांका गांधी सोबत शिमला येथे गेले आहेत.
चंडीगडहून ते शिमल्याला गेले. रस्त्यात ते अनेक ठिकाणी थांबले असे सांगितले जात आहे. स्थानिक नेते, कार्यकर्ते यांची भेट देखील यावेळी राहुल गांधी यांनी घेतली. छराबडा येथे प्रियांका गांधी यांच्या बंगल्याचे काम सुरु आहे, याठिकाणी ते आज भेट देणार आहे. राहुल गांधी पहिल्यांदाच प्रियांका गांधी यांच्या बंगल्याला भेट देणार आहेत.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड राज्यात सत्ता मिळविण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्षांनी खूप परिश्रम घेतले आहे. आता कॉंग्रेसने तीन राज्यात सत्ता स्थापन केली असून त्यानंतर ते सुट्ट्या घालविण्यासाठी शिमल्याला गेले आहे.