ऐन निवडणुकीच्या काळात राहुल गांधी बँकॉकला !

0

नवी दिल्ली: महाराष्ट्र व हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बँकॉकला रवाना झाले आहेत. रात्री ते बँकॉक रवाना झाले आहे. ट्विटरवर देखील ही RahulInBangkok हा हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये दिसत आहे.

महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत राहुल गांधी यांचे नाव समाविष्ट आहे. भारतातील 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर 2015 मध्ये राहुल गांधी बँकॉकला गेले होते. महाराष्ट्र व हरियाणातील विधानसभेचे मतदान 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे व 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत पक्षाला प्रचाराची गरज असतानाच राहुल गांधी बँकॉकला गेले आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेसची अवस्था बिकट आहे. त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याची गरज आहे. मात्र कॉंग्रेस नेते याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते.