भाजपचा संविधानावर हल्ला-राहुल गांधी

0

नवी दिल्ली-भाजप सरकार जातीयवादी विचाराने प्रेरीत असून जातीवादी विचारसरणी फोफावत चालली आहे. देशातील जनतेच्या छातीवर भाजप छुपा मार करत आहे. हे मध्यप्रदेशातील घटनेवरून उघड झाले आहे. मध्यप्रदेशातील दोन मुलांच्या छातीवर एससी (अनुसूचित जाती), एसटी (अनुसूचित जमाती) असे लिहले आहे. या घटनेवरून भाजपने संविधानावर हल केला आहे असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीटरच्या माध्यामातून केले आहे. एखाद्या पदभरतीसाठी गेलेल्या मुलांच्या छातीवर जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून राहुल गांधी यांनी आरोपाच्या फैरी झाडल्या आहे. भाजप आणि संघाचे विचार एकच असून या विचारातून दलितांवर अन्याय होत असतो असे आरोप राहुल गांधी यांनी केले आहे. या विचारला आपल्याला नेस्तनाभूत करायचे आहे असेही त्यांनी या ट्वीटमध्ये सांगितले आहे.