आरएसएसवरील आरोपाप्रकरणी राहुल गांधींना जामीन मंजूर

0

मुंबई: गौरी लंकेश हत्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांप्रकरणी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मानहानीच्या खटला दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना जामीन मंजूर झाली आहे. मुंबईतील काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड हे राहुल गांधींसाठी जामीन राहिले. १५ हजारांच्या जातमुचलक्यावर कोर्टाने राहुल गांधी यांना हा जामीन दिला. लोकसभा निवडणुकीदरम्यान आरएसएसविरोधी ट्विट केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी सुनावणीसाठी शिवडी कोर्टात पोहोचले.

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणात आपण दोष नसल्याने न्यायालयासमोर सांगितले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपांवरही आपण ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर या खटल्यामध्ये राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला.