नवी दिल्ली: नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना निवडणूक लढवू देऊ नये, अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानेही या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली असून या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.
बॅकॉप्स लिमिटेड या ब्रिटिश कंपनीच्या २००३ मधील नोंदीत राहुल गांधी हे संचालक असल्याचे म्हटले असून त्यात त्यांचे नागरिकत्व ब्रिटिश असल्याचे दिसून येते, असा आरोप आहे. राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा अमेठीतील एका अपक्ष उमेदवाराने उपस्थित केला आणि तेव्हापासून राहुल गांधी यांच्या अडचणीत भर पडल्याचे दिसते. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला असतानाच आता यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे. सुप्रीम कोर्टाने गुरुवारी या याचिकेवर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
आहेत.