राहुल गांधी आपल्या निर्णयावर ठाम; कॉंग्रेस मधील अंतर्गत वाद बाहेर येणार

0

नवी दिल्ली: लोकसभेचा निकाल लागल्यानंतर कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला राजीनामा दिला होता. राहुल यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा असे कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी सांगितले होते, पण राहुल आपल्या निर्णयावर ठाम आहे. राहुल यांच्या निर्णयामुळे राज्यांमधील कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत वाद उफाळून येण्याचे चिन्हे दिसत आहे.

कॉंग्रेसचे जेष्ठ नेते विरप्पा मोईली यांनी अध्यक्ष पद सोडण्याची ही वेळ नाही असे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घेत देशभरातील प्रदेश काँग्रेसमधील वाद मिटवून पक्षाला दिशा द्यायला हवी, असे मोईली म्हणाले. राहुल यानिम आपला राजीनामा मागे घ्यावा या साठी मोईली प्रयत्न करत आहे. कॉंग्रेस पक्षातल्या जेष्ठ नेत्यांनी या बाबत विचार करावा असेही मोईली म्हणाले.

राज्यांमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या काही नेत्यामध्ये वाद वाढले असून, त्यांच्यातील अंतर्गत धुसफूस बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हरियाणामध्ये प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांणा पदावरून काढावे असे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांनी केली आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरेद्र सिंह यांनी सिद्धू यांच्यावर टीका करणे सोडलेले नाही. महाराष्ट्रामध्ये
अशोक चव्हाण यांनाही पक्षात विरोधाचा सामना करावा लागत आहे.