अमेठी: अमेठीमधून राहुल गांधी हे पराभवाच्या उंबरठ्यावर असून स्मृती गांधी या ३५,८९९ मतांनी आघाडीवर आहे. अमेठी हा मतदारसंघ गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जात होता. अमेठी मध्ये राहुल गांधी यांनी आपला पराभव मान्य करत स्मृती इराणी यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत अमेठी मधून आपला पराभव मान्य करत स्मृतीचे अभिनंदन केले आहे.
सकाळी जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा प्राथमिक फेऱ्यामध्ये स्मृती इराणी ह्या आघाडीवर होत्या. मध्यंतरी स्मृती इराणी ह्या मागे पडत होत्या. पण दुपार नंतर स्मृती इराणी या विजयाकडे वाटचाल करत आहे. राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपला पराभव मान्य केला.
आज लागलेल्या निकालात अनेक दिग्गज मान्यवरांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.