‘पर्रीकरजी तुम्ही मोदींच्या दबावामुळे माझ्यावर टीका करत आहात’; राहुल गांधींचे पर्रीकरांना प्रत्युत्तर

0

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्याचे मुख्यामंत्री माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राफेल करारा संदर्भात चर्चा झाल्याचे राहुल यांनी म्हटले होते. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली. त्यानंतर पर्रीकरांनी राहुल गांधींना पत्र लिहून आपल्या भेटीत राफेलवर कोणतीही चर्चा झालेली नसतांना आपण का खोटे बोललात? याबबत विचारणा केली. यावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावामुळेच आणि त्यांच्याप्रती असलेल्या निष्ठेमुळेच तुम्ही माझ्यावर टीका करत आहात असे राहुल यांनी पत्राला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

‘तुम्ही मला पत्र लिहिलात आणि ते मी वाचण्याआधीच माध्यमांमध्ये लीक केलात यामुळे मी आश्चर्यचकीत आहे.

संबंधित बातमी-कालच्या भेटीबद्दल मनोहर पर्रीकरांनी राहुल गांधींना लिहिले हे खुले पत्र !

मी सन्मानपूर्वक सांगू इच्छितो की माझी आणि तुमची भेट संपूर्णपण खासगी होती. अमेरिकेत तुमच्यावर उपचार सुरु असताना देखील मी तुमच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी संपर्क केला होता’, असेही राहुल यांनी म्हटले आहे.

मी आपल्या भेटी दरम्यानची कोणतीच बाब सार्वजनिक केली नाही. मला तुमच्या तब्बेतीबद्दल सहानभूती आहे. मला माहिती आहे काल आपल्या भेटीनंतर तुमच्यावर किती दबाव आला असेल. या दबावामुळे पंतप्रधान आणि त्यांच्या सहकार्यांप्रति निष्ठा दाखवण्यासाठी तुम्हाला माझ्यावर टीका करत आहात असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे.