राहुल गांधी यांनी घेतली लालूंची भेट

0

नवी दिल्ली- चारा घोटाळ्यामुळे तुरुंगाची हवा खात असलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा आरजेडी पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती चांगली नसल्याने त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीबाबत विचारणा केली. तसेच दोघांमध्ये यावेळी विविध विषयावर चर्चा झाली. लालू प्रसाद यादव यांना मूत्रपिंड व हृदयाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.