नवी दिल्ली-आज लोकसभेत राफेल लढाऊ विमान घोटाळ्यावरून गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. संरक्षण दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या कराराला कॉंग्रेस विरोध करत आहे. राहुल गांधींना लढाऊ विमान काय आहे हेच कळत नाही अशी खरमरीत टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. लोकसभेत ते बोलत होते.
बालवाडीतील मुलाला राफेल कळेल पण राहुल गांधींना ते कळत नसल्याचे आरोप त्यांनी केले आहे. यावेळी जेटलींनी बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलॅड घोटाळ्याचा उल्लेख केला.
यावेळी भाजप खासदारांनी मॉ-बेटा चोर असल्याची घोषणाबाजी केली.